कुपवाड येथे महाआरोग्य शिबिरात २०४ जणांची तपासणी
सांगली:
सदर शिबिरामध्ये महिलांसाठी अँटी कॅन्सर वॅक्सीन, व्यसनमुक्ती मार्गदर्शन व उपचार, डोळ्यांचे विकार, दंत विकार दात काढणे व स्वच्छ करणे, पुरुष व महिलासाठी मेडिसिन विभाग तपासणी, आयुर्वेदिक उपचार, अस्थिरोग हाडांचे उपचार, स्त्रीरोग तज्ज्ञ, हॉमिपॅथिक उपचार, त्वचारोग उपचार हे संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले. या शिबिरात धनुर्वाताची लस व अँटीकॅन्सरची लस विशेषतःही स्त्रियांकरिता देण्यात आली
यावेळी सांगलीचे धर्मादाय आयुक्त डॉ. मनीष पवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांकिनी पाटील, धर्मादाय निरीक्षक सचिन पाटील, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, अभिजीत तोडकर, श्वेता कुलकर्णी, गणेश यादव उपस्थित होते.
तपासणी करण्यासाठी भारती हॉस्पिटल, चोपडे हॉस्पिटल, सिध्दीविनायक कॅन्सर हॉस्पिटल, वसंतदादा दंत हॉस्पिटल, गुलाबराव पाटील हॉस्पिटल, जी.एस. कुलकर्णी हॉस्पिटल, लायन्स नॅब आय हॉस्पिटल, वसंतदादा आयुर्वेदिक हॉस्पिटल, सोना हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होते.