BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात पाच दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम


भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात पाच दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये १७ मार्च ते २१ मार्च २०२५ या कालावधीत नर्सिंग शिक्षकांसाठी पाच दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम संपन्न होणार  आहे. हा कार्यक्रम ECHO इंडिया प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्याचे नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनी सांगितले. डॉ. विजया कुंभार, डॉ.जे.जी.बाहुबली  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

हा कार्यक्रम नर्सिंग शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यात संशोधन, अध्यापन आणि आरोग्यसेवा यासंदर्भातील कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जात आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमधील मान्यवर वक्ते आमंत्रित करण्यात आले आहेत.

पहिल्या दिवसाचा शुभारंभ भारती विद्यापीठ पुणे येथील पीएचडी विभागप्रमुख डॉ. सचिन कदम व माजी प्राचार्य, लीलाबाई ठाकरे कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबईच्या डॉ. नॅन्सी फर्नांडिस परेरा यांच्या उपस्थितीत झाला. डॉ. सुरेश रे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि महत्त्व स्पष्ट केले.

यानंतर, डॉ. नॅन्सी फर्नांडिस परेरा यांनी गुणात्मक संशोधन या विषयावर ऑनलाईन स्वरूपात पहिले सत्र घेतले. त्यांनी इतर संशोधन पद्धतींच्या तुलनेत गुणात्मक संशोधनाच्या विशेष बाबी स्पष्ट केल्या. नर्सिंग क्षेत्रात याचा कसा उपयोग होतो, रुग्णसेवा आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील त्याचे महत्त्व सांगितले.

प्रा. शैला मॅथ्यू यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. विशाल घोरपडे, सॅमसन कांबळे यांचे सहकार्य लाभले.