भारती हॉस्पिटलमध्ये काचबिंदू सप्ताह साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात आला.
९ - १५ मार्चपर्यंत हा सप्ताह होता. यानिमित्त काचबिंदूविषयी जनजागृती करण्यासाठी पोस्टर प्रदर्शनचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे यांच्याहस्ते करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड, ऑप्टोमेट्रीचे अजित लिमये, नेत्र विभागप्रमुख डॉ.राजेश गोटेकर उपस्थित होते.
काचबिंदू मुक्त जगासाठी एकत्र येणे ही यावर्षीची थीम होती.अधिष्ठाता डॉ.सारा धनवडे म्हणाल्या, डोळा हा नाजूक अवयव आहे. प्रत्येकाने डोळ्यांची काळजी घ्यावी. नेत्र विभागाने रुग्णांची काचबिंदूची मोफत तपासणी केली याचे कौतुक आहे.
काचबिंदूवर मात करण्याचे १० उपाय रुग्ण व नातेवाईकांना सांगितले.
डॉ.अजित जोशी म्हणाले, काचबिंदूने गेलेली नजर परत मिळवता येत नाही. डोळ्यांचा दाब नियंत्रित करून दृष्टी वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो.
डॉ.राजेश गोटेकर यांनी भारती हॉस्पिटलमध्ये काचबिंदूचे निदान व उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर असल्याचे सांगून रुग्णांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन डॉ.विराज पाटील, प्रास्ताविक डॉ.राजेश गोटेकर तर आभार डॉ. राधिका मुंदडा यांनी मानले. सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.