BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयातर्फे महिलांसाठी जनजागृती

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयातर्फे महिलांसाठी जनजागृती 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील महात्मा गांधी चौक व मिरज मार्केट येथे २० विद्यार्थ्यांनी फक्त हातवारे करून मुकसंवाद साधून नाटक सादर केले. महिलांच्यात जनजागृती करणे हाच मुख्य उद्देश होता. नर्सिंग महाविद्यालयातील महिलांविरुद्ध अंतर्गत तक्रार समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. 

नाटकात महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणावर भर दिला. सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेश रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.  मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा व पीएसआय मिनाक्षी माळी यांचेही सहकार्य लाभले. 

यावेळी लैंगिक अत्याचारास कसा प्रतिबंध करावा यांसह महिलांवर दिवसेंदिवस होणारे अन्याय कसे रोखायचे हे यातून स्पष्ट केले. 

समाजामध्ये होणारी लैंगिक विषमता आणि भेदभाव याबद्दल जागरूकता व्हावी. महिलांना अधिकचा सन्मान मिळावा यासाठी हे नाटक राबवण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनी सांगितले.सर्व पोलीसांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

डॉ.अपर्णा काळे, प्रा.शिल्पा सत्राळकर, प्रा.आशा जकनूर, प्रा.मिल्का देवराज यांच्यासह सर्व डॉक्टर, पोलीस व शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.