BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात महिला दिन उत्साहात

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात महिला दिन उत्साहात 

सांगली:-

येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, समानता, सक्षमीकरण याविषयी चर्चा करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या डीन डॉ. सारा धनवडे होत्या. उपस्थित सर्व महिलांचे स्वागत नर्सिंग प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांनी केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी प्रमुख उपस्थित होते.

डीन डॉ. सारा धनवडे यांनी महिला सक्षमीकरणाविषयी माहिती दिली. महिला अबला नसून सबला असल्याचे सांगितले. महादेव घोंगाडे यांनीही प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.

ज्यांनी महिला शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्टता आणि समानतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. महिला सक्षमीकरण आणि समानतेला प्रोत्साहन यावर त्यांनी भर दिला. ज्यामुळे महाविद्यालयातील महिलांमध्ये समुदाय आणि एकतेची भावना निर्माण झाली. उपस्थित सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून 'एच.पी.व्ही लसीकरण' सत्राचेही आयोजन करण्यात आले होते.

डॉ. विजया कुंभार, डॉ. अपर्णा काळे, प्रा.शिल्पा सत्राळकर, प्रा.सुदैवी कदम यांच्यासह भारती विद्यापीठ कॅम्पसमधील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रा. निकीता भंडारी यांनी आभार मानले.