
भारती हॉस्पिटलमध्ये ३१ मार्चपर्यंत मोफत आरोग्य शिबीर
भारती हॉस्पिटल न्यूज सांगली / (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत मोफत आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.
अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे यांनी ही माहिती दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा गायकवाड उपस्थित होते. या शिबिरात केस पेपर मोफत आहे. नॉर्मल प्रसूती व सिझेरियन शस्त्रक्रिया पूर्ण मोफत होणार आहे.
सर्व ऑपरेशनमध्ये पन्नास टक्के सवलत असून इम्प्लांट व जाळी विकत आणायची आहे. मेमोग्राफी, सोनोग्राफी मोफत (एक्स-रे फिल्म शिवाय) ऍडमिट पेशंटला एमआरआयमध्ये फिल्म शिवाय पन्नास टक्के सवलत आहे. सीबीसी प्लेटलेट काउंट, एचबी, टीसी, बीटीसीटी, युरीन-रुटीन, स्पुटम फॉर मालीग्नंट सेल्स, एचआयव्ही टेस्ट, स्किन क्लीप एक्झामिनेशन, स्टूल, ब्लड युरिया, सिरम क्रियाटिनीन, ब्लड शुगर या तपासण्या मोफत होणार आहेत.
रक्ताच्या ठराविक चाचण्यांमध्येही सवलत आहे. मोफत आरोग्य शिबीरात सुपर स्पेशालिटी म्हणजे न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, सीव्हीटीएस, सीसीयू व ईएमडी यांचा समावेश असणार नाही.
भारती हॉस्पिटल हे सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा असणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. २४ तास सेवा सुरू असून तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे.