BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात तंबाखू मुक्तीची कार्यशाळा


भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात तंबाखू मुक्तीची कार्यशाळा 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग आणि ग्लोबल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अँड इनोव्हेशन यांच्यामार्फत तंबाखूमुक्त निरोगी जीवन या विषयी कार्यशाळेचे आयोजन १९ फेब्रुवारीला करण्यात आले होते. स्वागत प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनी केले.

प्रमुख वक्ते म्हणून कॅनडा येथील हंबर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सुमेधा कुशवाह यांनी ऑनलाईन उपस्थित राहून सर्वांना माहिती दिली. यामध्ये तंबाखू सेवनाची कारणे, प्रकार आणि त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम सांगितले. त्यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तंबाखू सेवनावर कशी मात करता येईल हे पटवून दिले. 

ब्रुनेल युनिव्हर्सिटी लंडन येथील डॉ. मोहिता चड्ढा यांनीही तंबाखू सेवन बंद करण्यासाठी सल्लामसलत कशी करावी यावर प्रशिक्षण दिले.

डॉ. सुरेश रे म्हणाले, तंबाखू सेवनाचे प्रमाण भारतात आणि महाराष्ट्रात चिंताजनक आहे. तंबाखू सेवन हे कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनसंस्थेचे आजार यांसारख्या प्रतिबंधक रोगांचे प्रमुख कारण आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती.

यावेळी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी आभार मानले.