भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक कुष्ठरोग दिन साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्वचारोग विभागातर्फे जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात आला. 'Unite Act Eliminate' ही यावर्षीची थीम होती. अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, डॉ. शिल्पा गायकवाड, विभागप्रमुख डॉ. रेणुका अष्टेकर, डॉ. सुनील पाटील, वरदा सावर्डेकर उपस्थित होते.
या दिनाचे औचित्य साधून नर्सिंग स्टाफसाठी कुष्ठरोगाशी संबंधित रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन केले होते. यातून सामाजिक संदेश देण्यात आला. कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे, त्याचे प्रकार, कुष्ठरोगातील विकृती सांगण्यात आल्या. डॉ. सारा धनवडे यांनी कुष्ठरोगाशी संबंधित सामाजिक कलंक दूर होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. रेणुका अष्टेकर म्हणाल्या, भारती हॉस्पिटलमध्ये सर्व त्वचेवरील अत्याधुनिक उपचार, कुष्ठरोगांचे उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा. लवकर निदान करून योग्य उपचार केल्याने कुष्ठरोग बरा होतो. पुढच्या व्याधी टाळता येतात.
डॉ. पंकज पलंगे व डॉ. मधुरा किल्लेदार यांनी रांगोळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. डॉ. चंद्रशेखर पुरंदरे व डॉ. शांतीप्रसाद तिपण्णावर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वागत डॉ. राजवर्धन बागणे तर आभार डॉ. अनुप फडके यांनी मानले.
समाजात कुष्ठरोगाविषयी जागृती व्हावी यासाठी सरकार हा दिवस साजरा करते.