भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयातील बीएस्सी नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा १८ व्या बॅचच्या अभ्यासक्रमाचा दीपप्रज्वलन आणि शपथग्रहण सोहळा संपन्न झाला. नर्सिंगच्या जनक मिस फ्लोरेन्स नाइटिंगेल आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबईच्या रजिस्ट्रार श्रीमती अर्चना बढे होत्या. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्या डॉ. वैशाली जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. अँथनी रोझ, सिव्हिल हॉस्पिटल सांगलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास देवकरे प्रमुख उपस्थित होते.
भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीमती शैला मॅथ्यू यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग व्यवसायाची शपथ दिली.
प्रमुख पाहुणे अर्चना बढे म्हणाल्या, भारती विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक सर्वोत्तम विद्यापीठ आहे. त्यांनी नर्सिंग व्यवसायातील संधी, भूमिका आणि जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
डॉ.वैशाली जाधव यांनी विद्यार्थी ते प्राचार्यापर्यंतचा प्रवास सांगितला. डॉ.विकास देवकरे यांनीही नर्सेसच्या उत्कृष्ट गुणांचे कौतुक केले. डॉ.सारा धनवडे म्हणाल्या, आमच्याकडे उत्कृष्ट नर्सेस आहेत. त्या२४ तास रुग्णांची संपूर्ण काळजी घेतात.
डॉ. अँथनी रोझ यांनी सांगितले की, दीपप्रज्वलन आणि शपथग्रहण सोहळा हा नर्सिंग व्यवसायात प्रवेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. डॉ.विजया कुंभार यांनी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा महाविद्यालयीन अहवाल वाचून दाखवला.
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ.स्नेहा कटके, डेंटलचे प्राचार्य डॉ. शरद कामत, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्यासह सर्व डॉक्टर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. शिल्पा सत्राळकर तर आभार डॉ.धनराज बाबू यांनी मानले.