भारती हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी - डॉ.अभिनव मोहन यांची कामगिरी
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती हॉस्पिटलमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले की,
कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस विथ वेनोप्लास्टी ही शस्त्रक्रिया इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ.अभिनव मोहन यांनी चार तासांत यशस्वी पूर्ण केली. यावेळी डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी उपस्थित होते.
डॉ.अभिनव मोहन यांनी सांगितले की, रुग्णाला प्रोस्टेट कॅन्सर होता. पेटसिटी या टेस्टद्वारे कळाले की तो पसरला आहे. त्याने पुढचा टप्पा गाठला होता. पायाच्या अशुद्ध रक्तवाहिनीला वेढा मारल्यामुळे व डाव्या पायाची अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये थ्रोम्बोसिस गुठळ्या (रक्ताच्या) झाल्या. त्याला डीपवेन थ्रोम्बोसिस म्हणतात.
त्यामुळे अशुद्ध रक्तवाहिनीचे रक्ताभिसरण पुर्णपणे बंद झाल्याने त्याला पल्मोनरी इम्बोलिजम (हृदयविकाराचा छोटा धक्का येवून गेला होता.) फुप्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पायातील मोठ्या अशुद्ध गुठळ्या जाण्याचा धोका व त्यामुळे जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. रक्ताभिसरण होत नसल्याने तसेच शुद्ध रक्त आत येत असल्याने डाव्या पायाची सूज वाढत गेली, टणकपणा आला होता. त्याचा धोका कमी केला.
अशुद्ध रक्तवाहिन्यातील गुठळ्या काढण्याची प्रक्रिया केली. उर्वरित गुठळ्यांसाठी थ्रोम्बोलायसिस ही प्रक्रिया करून रक्ताभिसरण चालू केले.
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. अशुद्ध रक्तवाहिनीस कॅन्सरने वेढा मारल्याने कमकुवत होते. त्यामुळे तिला ईजा होण्याचा धोका असतो. कॅन्सरबाधित असल्याने इजा होण्याचा धोका होता. यासाठी सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजितसिंह जाधव हे अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध होते.
डॉ.श्रद्धा कोनिन, डॉ. वेणूश्रद्धा भोसले यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ.तरल मेहता व इतर डॉक्टरांचे सहकार्य लाभले.