भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात प्रोस्थोडॉन्टिक्स दिवस साजरा करण्यात आला. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम यांच्यासह दंतचे प्राचार्य डॉ.शरद कामत, उपप्राचार्या डॉ.जीवनाआशा अग्रवाल, प्रोस्थोडॉन्टिक्सचे विभागप्रमुख डॉ. राघवेंद्र आडकी, रोटरी क्लब ऑफ विश्रामबागचे प्रेसिडेंट राहुल शहा, सेक्रेटरी मोनिका कुल्लोळी व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
विश्रामबाग येथील चैतन्य वृद्धाश्रमामधील वृद्ध रुग्णांना प्रोस्थोडॉन्टिक्स दिनानिमित्त मोफत कवळी वाटप केले. त्याकरिता भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाने चैतन्य आश्रमला दत्तक घेतले होते. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ विश्रामबाग व भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.
डॉ. राघवेंद्र आडकी यांनी वयोवृद्धांना काय अडचण येते ते सांगून काळजी कशी घ्यायची ते सांगितले. तोंडाचे आरोग्य चांगले तर संपूर्ण शरीर चांगले असा संदेशही त्यांनी दिला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवळी वाटप करण्यात आले. इतर सर्व रुग्णांना विभागात कोणकोणते उपचार होतात याची माहिती पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी दिली.