भारती ग्रामीण रुग्णालयात ७० रूग्णांची मोफत तपासणी
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
तूरची येथील भारती ग्रामीण रुग्णालयात ७० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. १५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी भारती हॉस्पिटल सांगली येथे पाठविण्यात आले.
महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारती हॉस्पिटल सांगली व भारती ग्रामीण रुग्णालय तुरची फाटा यांच्यावतीने हे शिबिर आयोजित केले होते. याचे उद्घाटन ग्रामपंचायत तुरचीचे सरपंच विकास डावरे यांच्याहस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक संभाजी मोहिते यांनी केले. त्यानंतर सरपंच डावरे यांनी मार्गदर्शन केले. नेत्र चिकित्सक डॉ. सुमित डोंगरे यांनी नेत्र विभागातील विविध योजना व ऑपरेशनबद्दल माहिती दिली.
या शिबिरासाठी भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी व नेत्र विभागप्रमुख डॉ. राजेश गोटेकर, भारती ग्रामीण रुग्णालय तुरची फाटा येथील प्रमुख डॉ. मीनाक्षी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.