BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीची आरोग्य जागृती रॅली


भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीची आरोग्य जागृती रॅली

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ (अभिमत विश्व विद्यालय) स्पोर्ट्स क्लब, सांगली यांनी मानसिक आरोग्य जागृती रॅली २०२५ चे आयोजन केले होते.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच. एम. कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली समाजात जनजागृती  रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कडेगांव येथील भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे यांच्यासह भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे उपाधिष्ठाता डॉ.नितीन मुदिराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ. स्नेहा कटके, डॉ.प्रवीण दाणी उपस्थित होते. 

सकाळी ७ वाजता भारती हॉस्पिटल येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन केले. २१ किलोमीटरची बाईक रॅली आणि टॉर्च बेअरिंगसह दोन प्रकारात पार पडली.




विजयनगर चौक-विश्रामबाग चौक-पुष्पराज चौक, सांगली बसस्थानक-तरुण भारत स्टेडियम-सांगली महानगरपालिका-राजवाडा चौक-राममंदिर चौक-पुष्पराज चौक असा रॅलीचा मार्ग होता. या रॅलीचा समारोप भारती हॉस्पिटल कॅम्पस येथे झाला.  

कार्यक्रमाचे कोऑर्डिनॅटर स्कूल ऑफ फिजिओथेरपीचे विद्यार्थी गौरव मांगले, मृण्मयी भोसले, सोहम गुरव, वैष्णवी पाटील, आयुष्मा काळे, जयकुमार मोहिते आणि डॉ. सचिन शेट्टी होते.