BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीची कार्यशाळा संपन्न

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीची कार्यशाळा संपन्न 

भारती हॉस्पिटल न्यूज/ सांगली (रोहित रोकडे)

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टने येथील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपीमध्ये असेसमेंट इन न्यूरोडेव्हलपमेंटल डिले - अ हँड्स-ऑन वर्कशॉप ही प्री-कॉन्फरन्स कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित केली होती. अशी माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली. 

फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ.स्नेहा कटके यांनी आयोजन केले. त्या म्हणाल्या,या कार्यशाळेने व्यावसायिकांना मौल्यवान अंतर्दृष्टी आणि व्यावहारिक कौशल्ये प्रदान केली. सतत शिक्षण आणि सहयोगास प्रोत्साहन दिले. आयएपी त्यांच्या योगदानाबद्दल आयोजन समिती, संसाधन व्यक्ती, मान्यवर आणि प्रतिनिधींचे आभार मानते.

धारवाड येथील एसडीएम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. संजय परमार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, कराड, हुबळी आणि सांगली येथील १०० हून अधिक प्रतिनिधी या कार्यशाळेला उपस्थित होते. 

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी,  बालरोग विभागप्रमुख डॉ. सुहास कुंभार, डॉ. अमित तगारे, डेप्युटी डीन डॉ. नितीन मुदिराज, डॉ. आर.पी. लिमये उपस्थित होते.