भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम दंत विभागामार्फत याचे आयोजन केले होते.
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी प्रमुख पाहुणे होते. दंतचे प्राचार्य डॉ. शरद कामत, उपप्राचार्या डॉ.जीवनाशा अगरवाल, विभागप्रमुख डॉ.राघवेंद्र आडकी तसेच विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विभागातर्फे सर्व विद्यार्थ्यांकरिता रील स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान डॉ. आडकी यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे महत्त्व व कर्तव्ये सांगितली.
सदर स्पर्धेत ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली.