BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये वृक्षारोपण


भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये वृक्षारोपण 

भारती हॉस्पिटल न्यूज सांगली/(रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, 

भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप व भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम उपस्थित होते.

डॉ.अस्मिता जगताप म्हणाल्या, आरोग्याला पर्यावरणाची जोड असेल तर सदृढ समाज निर्माण होण्यास मदत होते. याचाच प्रत्यय भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय संकुलात पाऊल ठेवताच येतो. 

डॉ.एच.एम.कदम म्हणाले, भारती विद्यापीठचा सांगली कॅम्पस हिरवाईने नटलेला आहे. यासाठी स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांची प्रेरणा घेऊन झाडांची निगा राखण्यावर मी जातीने लक्ष ठेवतो. यावेळी डॉ. आर.बी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे, उदय पवार, प्रवीण चौगुले यांच्यासह सर्व डॉक्टर उपस्थित होते.