BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये ५२ जणांचे रक्तदान



भारती हॉस्पिटलमध्ये ५२ जणांचे रक्तदान 

भारती हॉस्पिटल न्यूज सांगली/ (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये ५२ जणांनी रक्तदान केले.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्याहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. ते म्हणाले, भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून आम्ही वारंवार भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करतो. याचा लाभ गरजू रुग्णांना होत आहे. रक्तदान करणे काळाची गरज आहे. आजकालच्या युगात ती आवश्यक बाब बनली आहे.



यावेळी युवा नेते डॉ.जितेश भैय्या कदम, पै.पृथ्वीराज पवार, अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, ब्लड बँकेचे इन्चार्ज डॉ. यशोधरा गोटेकर व सर्व सहकारी उपस्थित होते. मिरज येथील जिजाऊ संस्थेने  याचे आयोजन केले होते. पै.पृथ्वीराज पवार यांच्यासह ५२ जणांनी रक्तदान करून सामाजिक व्रत जपले. डॉ.एच.एम.कदम यांच्याहस्ते सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे,  रेल्वे पोलीसचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे, नगरसेवक करण जमादार, शिवाजी दुर्वे, प्रा.
सचिन जाधव, पत्रकार जगदीश धुळूबुळू, अशोक कोकळेकर, तुकाराम सातपुते यांच्यासह जिजाऊ संस्थेचे विनायक पवार, संजय म्हेत्रे, राम चंदनवाले, मनोज कांबळे, गणेश वर्जे महाराज उपस्थित होते.