अवयवदान केल्याने इतरांचे आयुष्य उजळून निघते-डॉ.हेमा चौधरी
भारती हॉस्पिटलमध्ये अवयवदानाविषयी प्रबोधन
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
माणूस जिवंतपणी किडनी, लिव्हर, ब्लड डोनेशन करू शकतो तर मृत्यूपश्चात एक व्यक्ति आठ जणांना आपले अवयव देऊ शकतो अशाप्रकारे जाताना आपण इतरांचे जीवन नक्कीच उजळून जाऊ शकतो असे मत द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर डॉ.हेमा चौधरी यांनी व्यक्त केले.
स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये त्या बोलत होत्या. आयोजन शरीरशास्त्र विभागातर्फे केले होते.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, उपअधिष्ठाता डॉ.नितीन मुदीराज यांचे सहकार्य लाभले. डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी उपस्थित होते.
'मरावे परी अवयव रुपी उरावे' हा संदेश देत डॉ. हेमा चौधरी यांनी अगदी सहज आणि सोप्या भाषेत अवयवदान व देहदानाबद्दल माहिती सांगितली. देहदानाचे महत्व एमबीबीएस व बीडीएसच्या विद्यार्थ्यांना सांगताना त्या म्हणाल्या की देहदान केलेले मृतदेह मेडिकलच्या पहिल्यावर्षी शवविच्छेदनासाठी उपयोग होतो व नंतर सर्जरीच्या विद्यार्थ्यांनाही होतो. अवयवदान कोणी करता येते व कुणासाठी करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यासाठी रजिस्टर कसे करावे - डोनर म्हणजे ज्यांना आपले अवयव द्यायचे आहेत ते प्रतिज्ञा घेऊ शकतात. रेसिपीएन्ट म्हणजे ज्याचे अवयव काही कारणास्तव निकामी झालेत असे रुग्ण आपले नाव zoto /notto याखाली नोंदणी करू शकतात.
स्वागत डॉ. शीतल पाटील तर आभार डॉ. प्रिया पाटील यांनी मानले.
एमबीबीएस, बीडीएसचे विद्यार्थी व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.