स्वसंरक्षण हा मुलभूत अधिकार - शिवानी जाधव l भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज सांगली (रोहित रोकडे)
स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार आहे. जो भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ मध्ये आढळलेल्या जीवनाच्या अधिकारांतर्गत येतो. त्याची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे.
समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान असेल तर त्याच्याशी लढण्यासाठी पुरेसे सामर्थ्य पाहिजे असल्याचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो व मार्शल आर्ट्समध्ये सुवर्णपदक विजेते कु. शिवानी जाधव (पुणे) यांनी सांगितले.
येथील भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय व रुग्णालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत 'स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम' राबवण्यात आला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी आजच्या युगात स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्राचार्य डॉ शरद कामत, उपप्राचार्य डॉ. जीवनआशा अग्रवाल, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी डॉ. समृद्धी मेथा यांच्यासह प्राध्यापक व स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.