भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रूग्ण सुरक्षा दिनी विविध उपक्रम- डॉ.एच.एम.कदम यांची माहिती
भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / रोहित रोकडे
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटना व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हा दिवस संपन्न झाला. या निमित्ताने १८-२३ सप्टेंबर या संपूर्ण आठवड्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी उपस्थित डॉक्टर, नर्सेस यांना या दिनाचे महत्त्व सांगून रुग्णांची अगदी घरच्यांसारखी काळजी घेण्यास सांगितले.
रुग्णांना त्यांच्या सुरक्षितेविषयी समाविष्ट करून घेणे ही यावर्षीची थीम होती. डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी प्रमुख उपस्थित होते.
क्वालिटी एस्युरन्स विभागाचे डॉ.महेश पाटील, एनएबीएच को-ओर्डिनेटर डॉ.राजश्री वायदंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दरम्यान राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (एनएमसी) फाउंडेशन दिवसही साजरा करण्यात आला. पोस्टर प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, मेडिकेशन सेफ्टी आदी उपक्रम आयोजित केले होते. यातील स्पर्धकांना प्रमाणपत्र व गिफ्ट देण्यात आले.
डॉ.सारा धनवडे, डॉ.अजित जोशी, डॉ.आर.पी.लिमये, डॉ.पंकज पलंगे यांनी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी नेमकी भूमिका काय असली पाहिजे हे स्पष्ट केले. एनएमसी दिवसाचे औचित्य साधून डॉ.नितीन मुदीराज यांनी प्रबोधन केले. सुत्रसंचालन डॉ.शिल्पा गायकवाड यांनी केले. सर्व डॉक्टर, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.