BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये स्तनपान सप्ताह


भारती हॉस्पिटलमध्ये स्तनपान सप्ताह

भारती हॉस्पिटल न्यूज | सांगली - रोहित रोकडे 

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये १ ते ७ ऑगस्टदरम्यान स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, बालरोग विभाग प्रमुख डॉ.सुहास कुंभार, नर्सिंग सुपरिटेंडंट सरस्वती हेरवाडे प्रमुख उपस्थित होते.

दरम्यान पोस्टर प्रदर्शनही भरविण्यात आले होते. त्यामध्ये स्तनपानाचे आईला व बाळास होणारे फायदे, स्तनपानाविषयी कुटूंबाच्या जबाबदाऱ्या, स्तनपानामुळे टाळता येणारे धोके आदींची माहिती स्पष्ट केली होती.  संयोजन डॉ.सुहास कुंभार यांनी केले. 

ते म्हणाले, आजच्या स्त्रीने फक्त चूल आणि मूल बघितले नाही तर ती सर्वच क्षेत्रात आघाडीवर असते.स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे. गरोदर महिलांना स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगितले. 

डॉ. उज्वला गवळी म्हणाल्या,  मातेचे दूध म्हणजे अमृतासमानच आहे. याच पार्श्वभूमीवर भारती हॉस्पिटलमध्ये 'हिरकणी कक्ष' स्थापन केला आहे.

डॉ. विराट तिवारी यांनी कामकाजाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी महिलांना स्तनपानासाठी वेळ देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. 

डॉ. अरुणिता देबनाथ यांनी स्तनपानाचे फायदे सांगून बाळाची प्रतिकारशक्ती वाढते. आई व बाळाचे नाते घट्ट होत असल्याचे सांगितले.

डॉ. अंकुश लुना म्हणाले, दुधाचा प्रवाह वाढविण्यासाठी पोषक आहार महत्त्वाचा आहे. याने अनेक आजार कमी होतात. परिणामी त्यापासून बाळाचे संरक्षण होते. आईचे दूध पौष्टिक असते.

भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेजच्या चौथ्या वर्षाच्या मुलींनी नाटक सादर केले. त्यातून प्रबोधन करण्यात आले.डॉ. मृणालिनी कुलकर्णी, डॉ. द्राक्षायणी गाडवे, डॉ. रेश्मा नायर, डॉ. आदित्य कुरडे, डॉ. राहुल काडगे, डॉ.संजीवनी देशपांडे यांच्यासह प्राध्यापक, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. उज्वला गवळी तर आभार डॉ.राहुल कवडे यांनी मानले.