येथील जनरल प्रॅक्टिशनर फोरम वैद्यकीय चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम समिती यांच्यामार्फत भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते. यासाठी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांचे सहकार्य लाभले. न्याय वैद्यकशास्त्रात येणाऱ्या डॉक्टरांना अडचणी त्यावर कशी मात करायची या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.
चर्चासत्राचे उद्घाटन डीन डॉ.सारा धनवडे यांच्याहस्ते करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड उपस्थित होते. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलचे डॉ.सुनिल कदम चर्चासत्रात प्रमुख वक्ते होते. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
जनरल मेडिकल प्रॅक्टिस करत असताना डॉक्टरांना वरचेवर येणाऱ्या कायदेशीर बाबींवरती व्याख्यान दिले. यामध्ये रुग्णांकडून निरनिराळे संमतीपत्र कसे घ्यायचे, त्याचे महत्त्व त्याचबरोबर विषबाधा त्या अनुषंगाने कायदेशीर अडचणींवर मात कशी करायची ते सांगितले. दाखल झालेले जखमी रुग्ण यांच्याबाबत असणारे कायदे त्याचप्रमाणे मृतावस्थेत दवाखान्यात आणणारे रुग्ण यासंदर्भात चर्चा केली. कायदेशीर मार्ग व सूचना सर्व डॉक्टरांना देण्यात आल्या.
या चर्चासत्रात उपअधिष्ठाता डॉ.पंकज पलंगे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड यांच्यासह जी.पी.फोरमचे सुमारे ५० हून अधिक डॉक्टरांनी यात सहभाग नोंदवला. यामध्ये डॉक्टरांनी निरनिराळे प्रश्न उपस्थित केले, काही अडचणी सांगितल्या. त्यावर डॉ.सुनिल कदम यांनी मार्गदर्शन केले.
जनरल प्रॅक्टिशनर फोरम सांगलीचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर जाधव, उपाध्यक्ष डॉ.विजय पवार, सचिव डॉ.विनय संकपाळ यांच्यासह विश्वस्त व अध्यक्ष डॉ.आनंद पोळ, डॉ.दिलीप शिंदे व जिल्ह्यातील डॉक्टर उपस्थित होते. स्वागत भारती मेडिकल कॉलेजचे डॉ.संतोष पाटील तर आभार डॉ.व्ही.एन.गुरव यांनी मानले.