BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

सदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक - आ.विक्रम सावंत l भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन


सदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक - आ.विक्रम सावंत l भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली /  रोहित रोकडे 

आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात मैदानी खेळ मागे पडत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सामने, स्पर्धा असतील तर पुढाकार घेऊन ते पुर्णत्वास नेले पाहिजे. सदृढ आणि निरोगी शरीर हवे असेल तर खेळ खेळलेच पाहिजेत असे प्रतिपादन जतचे आमदार विक्रम सावंत यांनी केले.

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. सावंत यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.नारायण घोरपडे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजच्या मैदानावर तीन दिवस या स्पर्धा होणार आहेत. राजकारणाच्या पटलावर जतमधून फलंदाजी करणारे आ. विक्रम सावंत यांनीही येथील मैदानावर क्रिकेट खेळत त्याचा मनमुराद आनंद लुटला.

डॉ.एच.एम.कदम म्हणाले, आजकाल तरुणाई मोबाईल, सोशल मिडिया यामध्ये गुंतली आहे. या आभासी जगातून बाहेर पडून सर्वांनी मोकळ्या मैदानावर यावे. व्यायामासह विविध खेळ खेळावेत जेणेकरून आपणास दिवसभर ताजेतवाने वाटेल.  एक नवी ऊर्जा प्राप्त होईल.  

या क्रिकेट स्पर्धेत सांगलीतील आयएमआरडी, मॅनेजमेंट, भारती हॉस्पिटल, भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज, न्यू लॉ कॉलेज आदींनी सहभाग घेतला आहे. 

यावेळी प्रा. सचिन सकटे, प्रा. विशाल घोरपडे, प्रा.गौरव आवटे, प्रा.जेसिका माळी, प्रा.ज्योत्सना कांबळे यांच्यासह प्राध्यापक व खेळाडू उपस्थित होते.