वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची - डॉ. एच. एम. कदम
भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक परिचारिका दिवस उत्साहात साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / रोहित रोकडे
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जागतिक परिचारिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा, नाटिका सादर करणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रुग्णांचे भविष्य डॉक्टरांइतकेच परिचारिकांच्या हातात आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात त्यांची भुमिका महत्त्वाची असल्याचे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले. सर्वांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.
डीन डॉ.सारा धनवडे, नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, डेप्युटी डीन डॉ.पंकज पलंगे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड प्रमुख उपस्थित होते. भारती हॉस्पिटल आणि भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
परिचारिका याच आपले भविष्य असतील अशा प्रकारची थीम यावर्षी होती. पोस्टर प्रदर्शनही भरवण्यात आले होते. यातून नर्सिंगचा फायदा, भूमिका दाखवण्यात आली.नाईंटिगेल यांना आधुनिक सुश्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. आरोग्य सेवेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो.
डॉ.चिदानंद चिवटे म्हणाले, नर्सिंगची भुमिका महत्त्वाची असते. काम करण्याची त्यांची एक उर्जा आहे. त्यांची शिस्तबद्धता वाखाणण्यासारखी आहे. सारा धनवडे म्हणाल्या, नर्स हा डॉक्टरांसारखाच महत्त्वाचा घटक आहे. रुग्णांशी त्यांचं एक भावनिक नातं असतं. हॉस्पिलला एनएबीएच मिळवण्यात त्यांची भूमिका उत्तम होती. त्यांचे सहकार्य असते. ते विविध भुमिका निभावत असतात, पार पाडतात असे सांगितले.
नर्सिंग सुपरिंडेंट सरस्वती हेरवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.दरम्यान नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्या डॉ.निलिमा भोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन नर्स एज्युकेटेड प्रिती तांदळे यांनी केले. यावेळी स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.विद्या जाधव, मेडीसीन विभाग प्रमुख डॉ.चिदानंद चिवटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास कुंभार, नेत्र विभाग प्रमुख डॉ.राजेश गोटेकर, ऑर्थोचे डॉ. सुनील पाटील, श्वेता कुलकर्णी, सुनिल काळे यांच्यासह नर्सिंग स्टाफ, डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.