भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज | सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी क्षयरोगाची लक्षणे त्यावर उपाय याची माहिती पोस्टर प्रदर्शनातून देण्यात आली.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजित जोशी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, मेडीसीन विभागप्रमुख डॉ.चिदानंद चिवटे प्रमुख उपस्थित होते. भारती हॉस्पिटलमधील श्वसनाचे विकार व भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेज यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यात क्षयरोगाची लक्षणे, कारणे, निदान याबद्दल माहिती देण्यात आली. उपायही सांगण्यात आले.
क्षयरोगाचे अद्यावत निदान व दररोज घ्यायचे उपचार सर्व शासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहेत. नियमित व पुर्ण उपचार घेतल्यास टीबी हमखास बरा होतो. टीबीचे जंतू खोकला किंवा शिंकल्याने पसरतात. त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना रुमालाने तोंड झाकण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.
नर्सिंग कॉलेजच्या श्वेता सातपुते व त्यांच्या ग्रुपने एक प्रबोधनपर नाटक सादर केले. यातून क्षयरोग रुग्णांची उर्जा वाढवण्यासाठी पोषक आहार देणे गरजेचे आहे. 'टीबी हरेल देश जिंकेल' असे सांगण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेले पोस्टर सुंदर होते. त्यातून एक संदेश दिला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक साक्षी साळुंखे, द्वितीय करिश्मा कोल्हापूरे, तृतीय किशोरी मोहिते, उत्तेजनार्थ समिक्षा शेगावकर यांना देण्यात आला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते टीपीटी गाईड लाईन बुकचे प्रकाशन करण्यात आले. निक्षय मित्रांमार्फत क्षयरोग रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
सुत्रसंचालन डॉ.मिरा प्रसाद तर आभार बसवंत दुडूम यांनी मानले.श्वसनविकारचे डॉ.गौरव फल्ले, डॉ.आर.पी.लिमये, डॉ.रवींद्र श्रावस्ती, डॉ.बसाप्पा कोळी,नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य प्रवीण दाणी, शिल्पा सत्राळकर, स्वाती कुरणे यांच्यासह डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.