भारती हॉस्पिटल "बेस्ट हॉस्पिटल" या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
भारती हॉस्पिटल 'Best Hospital with Medical College of the Year 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
'नवभारत' या प्रथितयश हिंदी मीडिया समूहातर्फे देण्यात येणारा 'Best Hospital with Medical College of The Year 2022 हा पुरस्कार भारती हॉस्पिटल पुणे यांना आज दि. 27 ऑक्टोबर रोजी दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भारती विद्यापीठ मेडिकल फौंडेशनच्या कार्यकारी संचालिका आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सौ.अस्मिता ताई कदम जगताप, भारती हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भारती हॉस्पिटल यांचे कोरोना काळातील कार्य आणि एकंदरीत गुणवत्तापूर्ण उपचार व वैद्यकीय शिक्षण याची दखल देशपातळीवरील नवभारत व महाराष्ट्रातील दै.नवराष्ट्र सारख्या मोठ्या माध्यम समूहाने दखल घेतली आणि संपुर्ण भारतामधून भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली.
आदरणीय विजयमाला (वहिनीसाहेब) पतंगराव कदम, डॉ. विश्वजीत (बाळासाहेब) पतंगराव कदम साहेब, सौ. डॉ.अस्मिता ताई कदम जगताप, यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटलची कामगिरी अलौकिक सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी पाहिलेले हे स्वप्न साकार झाल्याचा प्रत्यय या पुरस्कारामुळे येत आहे.