भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये बालरोग अतिदक्षता परिषदेचे आयोजन
सांगली / दि.११/१०/२०२२
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये बालरोग अतिदक्षता परिषद संपन्न झाली. भारती हॉस्पिटलमधील बालरोग विभाग, सांगली जिल्हा व शहर बालरोग तज्ज्ञ आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय या महापेडिक्रिटीकॉन परिषदेचे आयोजन केले होते. अशी माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम. कदम यांनी दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून भारती संकुलाचे शैक्षणिक संचालक डॉ.आर.बी.कुलकर्णी होते. परिषदेचे उद्घाटन बालरोग अतिदक्षता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.महेश मोहिते यांच्याहस्ते संपन्न झाले. राज्य अतिदक्षता संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय घोरपडे, भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे प्रमुख उपस्थित होते.
संपूर्ण राज्यातून २५० बालरोगतज्ज्ञ व ६० नर्सिंग स्टाफ यांनी दोन दिवस चालणाऱ्या चर्चासत्रात सहभाग घेतला. दोन दिवसांत चार वर्कशॉप घेण्यात आली.
बालरोग विभाग प्रमुख डॉ.सुहास कुंभार, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.पी. लिमये, डॉ.नितीन मुदीराज, राज्य बालरोग अतिदक्षता परिषदेचे सेक्रेटरी डॉ.विनायक पत्की (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), डॉ.सुधीर मगदूम, डॉ.मतीन शेख, डॉ. शरद घाटगे, डॉ.संभाजी वाघ उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ.शर्मिला देशपांडे, डॉ.उज्जवला गवळी तर आभार डॉ.सुहास कुंभार यांनी मानले.
ही राज्यस्तरीय परिषद यशस्वी पार पाडण्यासाठी भारती विद्यापीठ पुणेचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह आणि आमदार डॉ.विश्वजित कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.