सांगली | १७/१०/२०२२ - (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय संसर्ग प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, डॉ.निलम आत्तार प्रमुख उपस्थित होते.
डॉ.एच.एम.कदम यांनी या दिवसाचे महत्त्व सांगून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच औषधे घेण्याचा सल्ला दिला. डीन डॉ.सारा धनवडे यांनी संसर्ग टाळणे त्याचा अटकाव करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून प्रतिजैविकांचा होणारा अतिरेक टाळावा असे आवाहन केले. डॉ.अजित जोशी म्हणाले, प्रतिजैविकांचा योग्य तितकाच वापर करा. १७ ते २२ पर्यंत हा सप्ताह आहे. जंतू संसर्ग टाळणे हे सर्वांचे काम आहे. योग्य काळजी घेतल्यास इन्फेक्शन वर कंट्रोल करता येतो. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर होणारे इन्फेक्शन, योग्य काळजी घेतल्यामुळे कमी करता येणे शक्य झाले आहे. काळजी घ्यावी आणि संसर्ग टाळावा.
दरम्यान वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर, प्राध्यापक व हाऊसकिपींग स्टाफ यांनी पोस्टरमधून या दिवसाची जनजागृती केली. हॉस्पिलमध्ये लावलेल्या पोस्टरमधून त्याची माहिती रुग्ण व नातेवाईकांना पटवून देण्यात येत होती. सुत्रसंचालन इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर डॉ.निलम आत्तार यांनी केले. यावेळी प्रत्येक स्टाफ व नातेवाईकांकडून इन्फेक्शन कंट्रोलची प्रतिज्ञा घेण्यात आली.
उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड, डेप्युटी डीन डॉ.पंकज पलंगे, डॉ.नितीन मुदीराज, डॉ.आर.पी.लिमये, डॉ.राजर्षी वायदंडे, सायली शिंदे,एच.आर. मॅनेजर सौ.श्वेता कुलकर्णी उपस्थित होते.
इन्फेक्शन कंट्रोल नर्स सुनिल काळे, सुलोचना चिकुड, दीपमाला कुलकर्णी, रिमा लोखंडे, विरानी फाळके यांनी आयोजन केले.
या दिनानिमित्त रांगोळी प्रदर्शन, स्वच्छतेबाबत जागरुकता, हात धुण्याचे महत्त्व तसेच विद्यार्थी व डॉक्टरांसाठी मनोरंजनात्मक, ज्ञानवृद्धीचे खेळ आयोजित केले आहेत.