भारती हॉस्पिटलमध्ये 'ब्रेन स्टॉर्म' झालेल्या दोन्ही बालकांवर यशस्वी उपचार
ताप आणि झटके येत असणाऱ्या वय वर्षे पाच आणि सात असलेल्या लहान बालकांवर येथील भारती हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांनी दिली. यावेळी डीन डॉ.शहाजी देशमुख उपस्थित होते.
आधिक माहिती अशी, ताप येवून झटके येत असणाऱ्या लहान बालकांना येथील पिडीयाट्रिक विभागात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. त्या दोन्ही बालकांचे आठवड्यापासून झटके कमी येत नव्हते. रुग्णांची परिस्थिती फार गंभीर होती. ते व्हेंटिलेटरवर होते. अशा अवस्थेत कोणतेही झटक्याचे औषध लागू न पडल्यास डॉक्टरांची चिंता वाढते.
पुढे त्या रुग्णांचे ब्रेन स्कॅनिंग करण्यात आले. त्यामध्ये विशेष प्रकारची गोष्ट आढळून आली. स्कॅनिंगचा रिपोर्ट बघितल्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. सारा धनवडे, मेंदूतज्ञ डॉ. नमन शहा यांनी रूग्णांना 'ALERD' हा आजार असल्याचे निदान केले. हे दोन दुर्मिळ रोगी डॉक्टरांनी हाताळले.
'ALERD' ला ब्रेन स्टॉर्म असे म्हणतात. यात काही विशेष जंतूंचे इन्फेक्शनने धोकादायक गंभीर प्रकारची ऍलर्जी रक्तामध्ये निर्माण होते.या ऍलर्जीने बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम ब्रेनला नष्ट करून त्याला भयंकर डॅमेज निर्माण करतात. ब्रेन नष्ट होवून रूग्ण कोमात जातो. या उपचारात शरीर संरक्षण यंत्रणा कमी करणारे औषध दिले जाते. अशा प्रकारे दोन्ही रूग्णांना इम्युनो सप्रेसंट्स देण्यात आले नंतर रूग्णांत सुधारणा झाली. व्हेंटिलेटर काढण्यात आले. ताप कमी आला. आता ती दोन्ही बालके ठणठणीत झाली असून एक महिन्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. अशी माहिती मेंदूतज्ञ डॉ. नमन शहा यांनी दिली.
पिडीयाट्रिकचे सर्व स्टाफ मेंबर यांचे सहकार्य लाभले. मुले गंभीर स्थितीत असल्याने त्यांचे आई-वडील चिंताग्रस्त होते. डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडत भारती हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले.